शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरचा उपक्रम
कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरच्या मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अपघाती दुर्घटनेच्या प्रसंगी शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.